26.9 C
Latur
Sunday, May 29, 2022
Homeराष्ट्रीयमिरवणूक, रॅली, रोड शोवर निर्बंध कायम

मिरवणूक, रॅली, रोड शोवर निर्बंध कायम

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशातील ५ राज्यांमध्ये होणा-या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक झाली. निवडणूक रॅली, मिरवणुका आणि रोड शो यांवर निर्बंध कायम ठेवण्याचे मान्य केले आहे. सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार ही बंदी एका आठवड्याने वाढविण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्य सचिवांसह राज्याचे अधिकारीही बैठकीत सहभागी झाले. ८ जानेवारीला ५ राज्यांतील निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोगाने १५ जानेवारीपर्यंत रॅली आणि जाहीर सभांना बंदी घातली होती. जी नंतर २२ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली. आता पुन्हा एकदा त्याला एक आठवड्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. गेल्या ७ दिवसांत निवडणूक राज्यांमध्ये कोरोनाचा ट्रेंड मिक्स्ड झाला आहे.

ईशान्येकडील मणिपूर राज्यात दैनंदिन प्रकरणांत २६६ टक्के वाढ झाली आहे. याशिवाय उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्येही कोरोनाच्या रुग्णांमध्ये थोडीशी वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशातही १५ जानेवारी रोजी १५७४३ नव्या रुग्णांची नोंद झाली. ती २१ जानेवारीपर्यंत १६१५९ पर्यंत वाढली. म्हणजे ती २.६४ टक्के वाढ झाली. त्यामुळे कोरोनाच्या तिस-या लाटेत उत्तर प्रदेशात रॅली-रोड शोवरील बंदी कायम एक आठवडा कायम ठेवली आहे. दरम्यान, गोव्यात या ७ दिवसांत दैनंदिन केसेस कमी झाल्या आहेत. १५ जानेवारी रोजी ३२७४ प्राप्त झाले होते, जे २१ जानेवारीपर्यंत २६६८ पर्यंत कमी झाले. येथे १८.५ टक्केची घट दिसून आली.

मणिपूरमध्ये रुग्ण वाढले
मणिपूरमध्ये १५ जानेवारी रोजी १५८ रुग्ण आढळून आले, ही संख्या २१ जानेवारीपर्यंत ५७८ पर्यंत वाढली. म्हणजे २६६ टक्के वाढ झाली. १५ जानेवारी रोजी १०६३ सक्रिय रुग्ण होते, त्यानंतर २१ जानेवारीपर्यंत ही संख्या २८६० झाली. तसेच सक्रिय रुग्णांत १७९७ (१६९ टक्के) ची वाढ दिसून आली.

पंजाबमध्ये सक्रिय रुग्णांत २८.३ टक्के वाढ
पंजाबमध्ये १५ जानेवारी रोजी ६८१३ प्रकरणे नोंदवण्यात आली, ती २१ जानेवारी रोजी ७६९६ पर्यंत वाढली, म्हणजे १२.९ टक्के वाढ झाली. तसेच १५ जानेवारी रोजी ३७५४६ सक्रिय प्रकरणे होती. २१ जानेवारी रोजी ४८१८३ प्रकरणे वाढली. सक्रिय प्रकरणांत १०,९३७ (२८.३ टक्के) ची वाढ झाली.

उत्तराखंडमध्ये २९ टक्के वाढ
१५ जानेवारी रोजी उत्तराखंडमध्ये ३८४८ रुग्ण नोंदले गेले. त्यानंतर २१ जानेवारीला ४९६४ रुग्ण वाढले. त्यामुळे येथील रुग्णसंख्येत २९ टक्के वाढ झाली. राज्यात १५ जानेवारीला १४८९२ सक्रिय रुग्ण होते, त्यानंतर २१ जानेवारीला २६९५० झाले. त्यामुळे यात ८१ टक्के वाढ झाली.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या