26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रमिरा भाईंदरचे १८ नगरसेवक शिंदे गटात

मिरा भाईंदरचे १८ नगरसेवक शिंदे गटात

एकमत ऑनलाईन

मुंबई : आमदारांनंतर आता नगरसेवकांचेही एकनाथ शिंदे गटात इनकमिंग जोरात सुरू आहे. आज मीरा भाईंदरमधील १८ नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे गटात सामिल झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेला आता स्थानिक पातळीवरही धक्का बसत असल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी हॉटेल लीलामध्ये भाईंदरमधील १८ नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन समर्थन जाहीर केले.

राज्यात बाळासाहेबांच्या, आनंद दिघे यांच्या भूमिकेला पुढे घेऊन जाणारे सरकार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, संघटना, सामान्य माणूस यांनीसुद्धा आम्ही घेतलली भूमिका, स्थापन झालेले सरकार याला मान्यता दिली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. सर्वसामान्यांच्या सरकारला या १८ नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे. आम्हाला राज्यभरातून पाठिंबा आणि समर्थन मिळत आहे. मी त्यांचे मनापासून आभार मानतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

ठाणे महापालिकेतील जवळपास ६५ नगरसेवकांनी एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर नगरसेवकांचे इनकमिंग जोरात सुरू झाले. त्यानंतर नवी मुंबई, अंबरनाथ आणि कल्याण डोंबवलीमधील नगरसेवकांनीही एकनाथ शिंदे गटाकडे कल दर्शवला. आता नाशिक, दिंडोरी आणि उल्हासनगरच्या नगरसेवकांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर शिवसेनेला हा मोठा धक्का समजला जात आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या