33.5 C
Latur
Saturday, June 3, 2023
Homeक्रीडामुंबईचा शानदार विजय

मुंबईचा शानदार विजय

एकमत ऑनलाईन

मुंबई : सुर्यकुमार यादवचे अर्धशतक आणि डेविडच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने राजस्थानचा सहा विकेटने पराभव केला. राजस्थानने दिलेल्या २१३ धावांचे आव्हान मुंबईने तीन चेंडू आणि ६ विकेट राखून यशस्वी पार केले. राजस्थानचा पराभव करत मुंबईने रोहित शर्माला वाढदिवसाचे गिफ्ट दिले. राजस्थानच्या यशस्वी जयस्वाल याची शतकी खेळी व्यर्थ गेली. सुर्यकुमार यादवने ५५ धावांची खेळी केली तर टीम डेविडने अखेरीस १४ चेंडूत ४५ धावांचा पाऊस पाडला.

राजस्थानने दिलेल्या २१३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात निराशाजनक झाली. कर्णधार रोहित शर्मा अवघ्या तीन धावांवर बाद झाला. त्यानंतर ईशान किशन आणि कॅमरुन ग्रीन यांनी मुंबईचा डाव सावरला. पण दोघांनीही एकापाठोपाठ एक विकेट फेकल्या. ईशान किशनने २८ धावांची खेळी केली तर कॅमरुन ग्रीन याने ४४ धावांचे योगदान दिले. या दोघांना आर. अश्विन याने तंबूत धाडले. ग्रीन याने दोन षटकार आणि चार चौकार लगावले.

सूर्यकुमार यादव याने मुंबईचा डाव सावरला. सुर्यकमार यादवने झटपट धावा जमवल्या. सुर्यकुमार आणि तिलक वर्मा यांनी मुंबईच्या डावाला आकार दिला. सुर्यकुमार यादवने २९ चेंडूत ५५ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ८ चौकार आणि २ षटकार लगावले. सुर्यकुमार यादव मुंबईला सहज विजय मिळून देईल, असे वाटत होते. पण बोल्टच्या गोलंदाजीवर संदीप शर्मा याने जबरदस्त झेल घेतला. सुर्यकुमार बाद झाल्यानंतर टीम डेविड आणि तिलक वर्मा यांनी मुंबईला विजय मिळवून दिला.

तिलक वर्मा याने नाबाद २९ धावांची खेळी केली तर टीम डेविड याने १४ चेंडूत ४५ धावांचा पाऊस पाडला. यामध्ये डेविड याने पाच षटकार लगावले. राजस्थानकडून आर अश्विनने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या तर संदीप शर्मा आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या