22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeमहाराष्ट्रमुंबईत पार्किंगसाठी निश्चित धोरण आहे का?

मुंबईत पार्किंगसाठी निश्चित धोरण आहे का?

एकमत ऑनलाईन

मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
मुंबई : मुंबईत दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे वाहनांच्या पार्किंगसाठी काही निश्चित धोरण आहे का आणि असेल तर कोणते, अरूंद रस्त्यांवर राहणा-यांच्या वाहनांसाठी काय उपाययोजना केल्या आहेत? असे सवाल उपस्थित करून त्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश सोमवारी हायकोर्टाने राज्य सरकारला दिले.

दिवसेंदिवस वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे मुंबईत वाहने कुठे उभी करायची? असा सवाल उपस्थित करत वाहनतळांसाठी आणि विशेषत: अरूंद रस्त्यांवरील वाहनांसाठी जागा निश्चित करण्याची आवश्यकता असल्याचे मत मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या खंडपीठाने यावेळी स्पष्ट केले.

मुंबईतील अरुंद रस्त्यांची यादी करून तिथे वाहने उभी करण्यासाठी जागा कशी उपलब्ध करता येईल? हे पाहणे गरजचे आहे. त्यासाठी सरकार आणि पालिकेने एकत्रित धोरण आखण्याची सूचनाही न्यायालयाने केली आहे. मुंबईत वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु त्या उभ्या करण्यासाठी निश्चित जागा नसल्यामुळे गाड्या उभ्या कुठे करायच्या? हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना भेडसावत आहे. प्रत्येकालाचा ड्रायव्हर ठेवणे परवडत नाही, असेही न्यायालयाने प्रशासनाला सुनावले. त्यामुळे मुंबईतील वाहनांच्या पार्किंगची जागा निश्चित करण्यासाठी केलेल्या व प्रस्तावित असलेल्या उपाययोजना चार आठवड्यांत सादर करण्याचे आदेश राज्य सरकारला देत ही सुनावणी तहकूब करण्यात आली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या