21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeमहाराष्ट्रमुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग

मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग

एकमत ऑनलाईन

अंधेरी, दादर, परळ भागात साचले पाणी, रस्ते जाम
मुंबई : सध्या राज्यात काही भागात पावसाने दडी मारली आहे, तर काही भागात चांगला पाऊस झाला आहे. मुंबईसह उपनगर आणि ठाणे परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे आणि त्यामुळे मुंबई जाम झाली आहे. अंधेरी, दादर, परळ भागात पाणी साचल आहे. दादर आणि परळमध्ये पाच किलोमीटरपर्यंत गाड्यांच्या रांगा लागल्यात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

मध्य रेल्वे मार्गावर दादर स्टेशनवर तांत्रिक बिघाड झाल्याने गुरुवारी रात्री लोकलच्याही रांगा लागल्या. त्यामुळे प्रवासी लोकलमध्ये अडकले होते. मुंबईत रस्ते जाम आणि लोकल ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळाला. जोरदार पावसात मुंबई तुंबली आहे. मुंबई, मुंबई उपनगरसह कोकणामध्ये पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबईत सलग 12 तास पाऊस झाल्यानंतर मुंबई आणि आसपासच्या परिसरात पाणी साचले आहे. पहिल्याच मुसळधार पावसात मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईतील पावसाची आकडेवारी समोर आली आहे. मुंबईत सकाळी ८ ते रात्री ८.३० पर्यंत बारा तासांत कुलाबा १७६ मिमी पावसाची नोंद करण्यात आला आहे. मुंबईतील सांताक्रुज १३७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

सखल भागात पाणीच पाणी
पावसामुळे अंधेरी सब वे, हिंदमाता, सक्कर पंचायत वडाळा, एसआयईएस कॉलेज वडाळा, किंग्ज सर्कल, सायन आदी काही सखल भागात काही प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. दरम्यान, पुढील तीन ते चार दिवसांमध्ये दक्षिण कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या