28.5 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeआंतरराष्ट्रीयमुंबईत २० कोटींचे कोकेन जप्त : दोन परदेशी महिलांना बेड्या

मुंबईत २० कोटींचे कोकेन जप्त : दोन परदेशी महिलांना बेड्या

एकमत ऑनलाईन

मुंबई : बुटामधून कोकेनची तस्करी करणा-या दोन महिलांना ताब्यात घेत अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एन. सी. बी) सोमवारी टाकलेल्या छाप्यात २ किलो ८०० ग्राम कोकेन जप्त केले. सापडलेल्या ड्रग्जची बाजारातील किंमत जवळजवळ २० कोटी आहे.

मरिंडा एस असे अटक ड्रग्ज तस्कर महिलेचे नाव आहे. मरिंडासह आणखी एक महिला दक्षिण आफ्रिकेवरून आल्या होत्या. या दोघींनी वेगवेगळ््या आकाराचे ८ पॅकेट बुट आणि पर्समध्ये लपविले होते. मुंबई, गोवा आणि नजीकच्या भागात न्यू इअर पार्टीसाठी ड्रग्जची ही तस्करी केली जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

बुट आणि पर्समध्ये लपविले ड्रग्ज
हे ड्रग्ज इथिओपियाची राजधानी आदिस अबाबा येथून मुंबईला येणार असल्याची टीप एनसीबीला मिळाली होती. मुंबई एनसीबी पथकाने तत्काळ मुंबई विमानतळावर धाव घेत सापळा रचला. अदीस अबाबाहून आलेले विमान मुंबई विमानतळावर पोहोचताच या दोन महिलांना पथकाने अडविले. दोघींच्या सामानाची झडती घेतली असता २ किलो ८०० ग्राम उत्तम दर्जाचे कोकेन पथकाच्या हाती लागले. दोघींनी हे ड्रग्ज बूटांचे प्रत्येकी २ जोड आणि पर्सच्या पोकळ जागेत लपविले होते.

आता शोध नायजेरियन नागरिकाचा
हे ड्रग्ज मुंबईतील एच. मुसा या नायजेरियन नागरिकाला पुरवले जाणार असल्याचे मरिंडा एस या दक्षिण आफ्रिकन महिला ड्रग्ज तस्कराने पोलिसांनी केलेल्या चौकशीत सांगितले. अटक महिलांची स्थानिक आणि परदेशी ड्रग्ज तस्करांचे संबंध गोळा करण्यासाठी चौकशी केली जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या