27.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeराष्ट्रीयमुख्यमंत्री ठाकरे यांची राहुल गांधी घेणार भेट

मुख्यमंत्री ठाकरे यांची राहुल गांधी घेणार भेट

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर राऊत यांनी जो तपशील दिला, तो विचारात घेता या दोन्ही पक्षांमधील जवळीक वाढत चालली आहे, हे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची इच्छा प्रदर्शित केली असून याच महिनाअखेरीस राहुल हे मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतील, अशी शक्यता आहे.

संजय राऊत हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे दूत म्हणून काँग्रेस हायकमांडसोबत चर्चा करत आहेत. आज राऊत यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली तर उद्या ते प्रियंका गांधी यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. आज राऊत यांनी राहुल यांच्याशी जवळपास पाऊण तास चर्चा केली. ही भेट राजकीय होती. यात सुरुवातीला काही वेळ काँग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल सहभागी झाले होते. त्यानंतर राहुल व राऊत या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली.

देशातील सध्याची राजकीय स्थिती, विरोधी पक्षांची आघाडी, महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा पुढचा प्रवास, विरोधी पक्षांची संघटनात्मक स्थिती अशा विविध मुद्यांवर हे दोन्ही नेते बोलले. याबाबत राऊत यांनीच माध्यमांना माहिती दिली. शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रीय पातळीवर एकत्र येणार का, या प्रश्नावर राऊत यांनी थेट उत्तर दिले नाही. मात्र, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची भेट लवकरच होणार असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या