मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यातील दोन वाहनांना अपघात झाल्याचे बातमी समोर आली आहे. मुंबई महापालिकेजवळ हा किरकोळ अपघात झाला. यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला भेट दिल्यानंतर ते पावसाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाला भेट देण्यासाठी रवाना झाले. यावेळी पालिकेच्या मुख्यालयाजवळ येताना त्यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांचा अपघात झाला. ताफ्यातील एका कारने पुढच्या कारला मागून जोरदार धडक दिली. पुढच्या कार चालकाने आपत्कालीन ब्रेक दाबल्याने हा प्रकार घडला. पुढची कार अचानक थांबल्याने मागच्या कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती पुढच्या कारवर आदळली. परंतु या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही, अशी माहिती आहे.