24.9 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeमहाराष्ट्रमुलासाठी महावितरणची यंत्रणा वेठीस

मुलासाठी महावितरणची यंत्रणा वेठीस

एकमत ऑनलाईन

मुंबई : युवक काँग्रेसच्या निवडणुकीत ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडून महावितरणच्या यंत्रणेचा वापर केला जात आहे. या निवडणुकीत त्यांचा मुलगा उभा असल्याने राऊत यांनी महावितरणच्या यंत्रणेचा बेकायदेशीरपणे वापर सुरू केला आहे, असा आरोप भाजपच्या युवा मोर्चाने केला आहे. या प्रकरणी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही भारतीय जनता युवा मोर्चाने केली आहे.

भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. राज्याच्या ऊर्जामंत्र्यांचे चिरंजीव कुणाल हे लढवत असलेल्या प्रदेश युवक काँग्रेसच्या पदाधिकारी निवडणुकीसाठी महावितरणची यंत्रणा वापरली जात आहे. तसे सिद्ध झाल्याने ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केली.

कंत्राटदारांना दम
नवी मुंबईत वाशी येथे सोमवार, दि. ६ डिसेंबर रोजी महावितरणचे अधिकारी एका बैठकीत महावितरणच्या कर्मचा-यांना तसेच कंत्राटदारांना या निवडणुकीसाठी सदस्य नोंदणी कशी करावी याचे मार्गदर्शन करत असतानाची ध्वनिचित्रफीत सादर केली. या कामात मदत करण्यासाठी ‘वरून दबाव’ आहे. तसेच या कामात मदत केल्यास कंत्राटदारांना योग्य बक्षीस मिळेल, मदत न केल्यास त्याचेही ‘फळ’ मिळेल अशा भाषेत महावितरणचे अधिकारी या बैठकीत बोलत असल्याचे दिसून येते.

राऊतांनी जबाबदारी स्वीकारावी
वाशी येथील घटनेतून महावितरणची यंत्रणा नितीन राऊत यांनी आपल्या चिरंजीवांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या दावणीला बांधली असल्याचे सिद्ध झाले आहे. या प्रकाराची जबाबदारी स्वीकारून राऊत यांनी ऊर्जामंत्रीपदाचा तातडीने राजीनामा द्यावा, अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा राज्यभर आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या