25 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeराष्ट्रीयमुसेवालाच्या मारेक-याचा खात्मा

मुसेवालाच्या मारेक-याचा खात्मा

एकमत ऑनलाईन

चकमकीत चारही शुटर्सचा मृत्यू
अमृतसर : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याच्या खुन्याच्या शोधात असलेल्या पंजाब पोलिसांनी मारेकरी लपून बसलेल्या जुन्या वाड्याचा ताबा घेतला आहे. चकमक संपून चारही मारेकरी मारले गेल्याचा दावा स्थानिक आमदार जसविंदर रामदास यांनी केला. या वाड्यात फक्त चार शूटर्स लपले होते, असा त्यांचा दावा आहे. याआधी जगरूप उर्फ रूपा ठार झाल्याची आणि मनप्रीत उर्फ मन्नू चकमकीत ठार झाल्याची बातमी आली होती.

मूसेवालाच्या हत्येनंतर दोन्ही शूटर ५२ दिवस फरार होते. दरम्यान, एका वृत्त वाहिनीच्या पत्रकारालाही या चकमकीत गोळ््या लागल्या असून तो जखमी झाला. शूटर्सच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर पंजाब पोलिस मोठ्या फौजफाट्यासह अटारीच्या चिचा भकना गावात पोहोचले. या चकमकीत अमृतसर जिल्ह्यातील संपूर्ण पोलीस बंदोबस्ताला तैनात करण्यात आले. चकमकीत तीन पोलिस आणि तीन नागरिकही जखमी झाल्याचा आमदाराचा दावा आहे.

गुप्त माहिती मिळाल्यानंतर जगरूप उर्फ रूपा आणि मनप्रीत उर्फ मन्नू यांना पंजाब पोलिसांनी अटारी सीमेजवळील गावात घेरले. मन्नूने मूसेवालावर एके-४७ ने गोळया झाडल्या होत्या. पंजाब पोलिसांना हे दोन्ही शूटर अटारी आणि आसपासच्या गावात असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी गोळीबार केला असता पलिकडून प्रत्युत्तरात गोळीबार करण्यात आला. या चकमकीत चौघेही ठार झाल्याचे सांगण्यात आले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या