22.3 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeराष्ट्रीयमुस्लिमांना शांततेने जगू द्या

मुस्लिमांना शांततेने जगू द्या

एकमत ऑनलाईन

बंगळूरू : बंगळुरूमध्ये हिंदूू आणि मुस्लिम समाजामध्ये वारंवार होणा-या संघर्षाच्या घटनांबाबत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येदियुरप्पा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मुस्लिमांच्या मालकीच्या व्यवसायांना लक्ष्य करण्याच्या हिंदू संघटनांवर टीका केली आहे. ते म्हणाले आहेत की, मुस्लिमांना शांततेत आणि सन्मानाने जगू द्या. कर्नाटकातील धारवाडमध्ये श्री राम सेनेच्या चार कथित सदस्यांनी मुस्लिम समाजातील फळ विक्रेत्यांच्या गाड्यांची तोडफोड केल्याच्या घटनेवर त्यांनी हे विधान केले आहे.

त्यांनी हिंदुत्ववादी संघटनांना अशा कारवाया थांबवण्याचे आवाहन केले आहे. येदियुरप्पा म्हणाले आहेत की, हिंदू आणि मुस्लिमांनी एकाच आईच्या मुलांसारखे एकत्रित राहावे, अशी माझी इच्छा आहे. काही समाजकंटक यात अडथळा आणत असतील, तर त्यांच्यावर कारवाई करावी. याबाबत मुख्यमंत्र्यांनीही आश्वासन दिले आहे. ते म्हणाले, किमान यापुढे तरी अशा अनुचित घटना घडू नयेत आणि आपण एकत्रित राहायला हवे. अशा कृत्यांमध्ये सहभागी असलेल्यांनाही मी शांततेचे आवाहन करतो.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या