24 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमृत्युमुखी पडलेल्या गोंिवदाला १० लाखाची मदत ! -मुख्यमंत्री

मृत्युमुखी पडलेल्या गोंिवदाला १० लाखाची मदत ! -मुख्यमंत्री

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.२३(प्रतिनिधी) दहीहंडी फोडताना सात थरावरून पडल्याने मृत्युमुखी पडलेल्या संदेश दळवी या गोंिवदाच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची मदत करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारच्या गोविदा पथकांना देण्यात येणा-या १० लाखाचा विमाबाबतचा मुद्दा आज विधानसभेत उपस्थित केला. संदेश दळवी यांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये मदत देण्याची मागणी त्यांनी केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृत संदेश दळवी गोंिवदाच्या नातेवाईकांना तात्काळ १० लाखांची मदत दिली जाईल, अशी घोषणा केली.

जखमी गोविदांबाबत आपण स्वत: महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याशी बोललो होतो. जखमी गोंिवदांसाठी एक विशेष अधिकारी नेमून त्यांचा उपचारासाठीच्या व्यवस्थेची जबाबदारी त्याच्यावर द्यावी असे आयुक्तांना सांगितले होते. शिवाय शासनाने मृत गोंिवदांना १० लाखांच्या विम्याची मदत देणाचे घोषित केले होते. परंतु विम्याचा प्रकियेला विलंब लागत असल्याने तात्काळ मृत व जखमी गोंिवदाना मुख्यमंत्री निधीतून सरकारच्या वतीने मदत केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या