गांधीनगर : वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन(डब्ल्यूएचओ) च्या कोरोनामुळे झालेल्या रुग्णांचे मृत्यू मोजण्याच्या पद्धतीवर भारताने आक्षेप घेतल्यानंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर डब्ल्यूएचओ प्रमुख गुजरातला भेट देणार आहेत. डब्ल्यूएचओ महासंचालक डॉ. टेड्रोस अधानोम घेब्रेयसस हे सोमवारी गुजरातच्या तीन दिवसीय दौ-यावर येणार आहेत.
यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ते काही कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार असल्याचे अधिका-यांनी सांगितले. घेब्रेयसस १८ एप्रिलला राजकोटला पोहोचतील.
त्यानंतर दुस-या दिवशी ते जामनगरमध्ये पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. येथे ते डब्ल्यूएचओच्या ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिनच्या पायाभरणी समारंभाला उपस्थित राहतील. राजकोटचे जिल्हाधिकारी महेश बाबू यांनी रविवारी सांगितले की, जीसीटीएम ही पारंपारिक औषधांसाठी जगातील पहिली आणि एकमेव जागतिक आऊटपोस्ट असेल. ते म्हणाले की, गेब्रेयसस गुरुवारी गांधीनगरला जाणार आहेत. याचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आयुष इंन्व्हेस्टमेंट आणि इनोव्हेशन शिखर परिषदेत होणार आहे.
मॉरिशसचे पंतप्रधानही देणार भेट
तर राजकोटचे महापौर प्रदिव दाव यांनी सांगितले की, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ हे देखील सोमवारी राजकोटला पोहोचणार आहेत. येथे त्यांचे विमानतळावर सांस्कृतिक कार्यक्रमांनी स्वागत करण्यात येणार आहे.