28.4 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeराष्ट्रीयमोस्ट वाँटेड दहशतवादी हरविंदर सिंघ रिंदाचा मृत्यू

मोस्ट वाँटेड दहशतवादी हरविंदर सिंघ रिंदाचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतातून निसटून पाकिस्तानात पळालेला मोस्ट वाँटेड दहशतवादी हरविंदर सिंघ रिंदा याचा लाहोरमध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.अंमली पदार्थाच्या अतिसेवनामुळे त्याचा मृत्यू झाला असावा, असा संशय व्यक्त होत आहे.

हरविंदर सिंघ हा पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या सांगण्यावरून काम करत होता. त्याने पंजाबसह देशात दहशत पसरवण्याची कारस्थाने केली आहेत. त्याने पंजाबमधील आंतरराष्ट्रीय सीमेवरून ड्रोनद्वारे पाकिस्तानातून शस्त्रे पाठवण्यास सुरुवात केली होती. अलीकडे पंजाबमधील अनेक मोठ्या घटनांमध्ये त्याचे नाव पुढे आले होते.

रिंदा हा पंजाबमधील तरनतारनचा रहिवासी होता. तो नंतर राज्यातील नाशिक येथे स्थलांतरित झाला. त्यानंतर तो शिक्षण घेण्यासाठी चंदीगड येथील पंजाब विद्यापीठात आला आणि याच दरम्यान रिंदाने गुन्हेगारीच्या जगात पाऊल ठेवले. हरविंदर रिंदा याला किडनीच्या समस्येमुळे गेल्या आठवड्यात शनिवारी रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयामध्ये त्याला इंजेक्शन देण्यात आले, त्यातच त्याचा मृत्यू झाला, असे सांगितले जात आहे.

अनेक प्रकरणात मोस्ट वाँटेड

हरविंदर रिंदा हा पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि महाराष्ट्रात कुख्यात गुंड राहिला आहे. खून, कॉन्ट्रॅक्ट किलिंग, खंडणी व चेन स्नॅचिंग अशा अनेक गुन्ह्यांमध्ये तो पंजाब पोलिसांना हवा आहे. हरविंदर रिंदा याने अलीकडेच पंजाब पोलिसांच्या गुप्तचर विभागाच्या मुख्यालयावर रॉकेट हल्ला घडवून आणला होता. यापूर्वी त्याने नवांशहर, आनंदपूर साहिब आणि काहलवान येथील सीआयए कार्यालयावर आयईडी हल्ले घडवून आणले होते. कर्नालमध्ये काही काळापूर्वी सापडलेल्या बॉम्बमागेही रिंदाचाच हात होता.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या