27.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeक्रीडामो. हाफिज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

मो. हाफिज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

एकमत ऑनलाईन

मुंबई : पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू आणि माजी कर्णधार मोहम्मद हाफिजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. ३ जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन ते अधिकृतपणे निवृत्त होणार आहे. मोहम्मद हाफीजची आंतरराष्ट्रीय कारकीर्द 18 वर्षे चालली आणि या काळात त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये भरपूर यश मिळवले. तो पाकिस्तानच्या यशस्वी खेळाडूंपैकी एक आहे.

नुकत्याच पार पडलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत तो अखेरचा मैदानात दिसला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असला तरी हाफिज फ्रेंचायझी क्रिकेट खेळत राहील आणि जगभरातील टी-२० लीगचा भाग असेल.

हाफिजने डिसेंबर २०१८ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तसेच, २०१९ च्या विश्वचषकानंतर, निवडकर्त्यांनी एकदिवसीय फॉर्मेटमध्ये त्याची संघात निवड केली नाही. तेव्हापासून, तो केवळ टी-२० फॉरमॅटमध्ये खेळतोय. यामुळे २०२१ चा टी-२० वर्ल्ड कप ही त्याची शेवटची आंतरराष्ट्रीय स्पर्धा असेल, असे हाफिजने म्हटले होते. पण कोरोनामुळे हा विश्वचषक २०२१ पर्यंत पुढे गेला, त्यामुळे हाफिजचा वेळही वाढला. हाफीजने एप्रिल २००३ मध्ये झिम्बाब्वे विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ऑगस्ट २००३ मध्ये कसोटी पदार्पण आणि ऑगस्ट २००६ मध्ये टी२० पदार्पण केले.

हाफिजची शानदार कारकीर्द
मोहम्मद हफीझने डिसेंबर २०१८ मध्ये शेवटची कसोटी, जुलै २०१९ मध्ये शेवटचा एकदिवसीय सामना आणि नोव्हेंबर २०२१ मध्ये शेवटचा टी-२० सामना खेळला होता. २०२१ च्या टी २० विश्वचषकातील पाकिस्तान संघाचाही तो भाग होता. ४१ वर्षीय हाफिजने २१८ एकदिवसीय सामन्यांमध्ये ११ शतकांच्या मदतीने ६६१४ धावा केल्या आहेत आणि १३९ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच वेळी ५५ कसोटींमध्ये त्याने १० शतकांसह ३६५२ धावा केल्या आहेत आणि ५३ विकेट्स त्याच्या नावावर आहेत. ११९ टी-२० सामन्यांमध्ये त्याने २५१४ धावा केल्या आहेत आणि तसेच त्याने ६१ विकेट घेतल्या आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या