27.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeराष्ट्रीयमौर्य यांच्यासह ८ भाजप आमदार समाजवादी पक्षात

मौर्य यांच्यासह ८ भाजप आमदार समाजवादी पक्षात

एकमत ऑनलाईन

लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक तोंडावर असताना भाजपला गळती लागली आहे. आमदार स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासह ८ आमदारांनी आज समाजवादी पक्षात प्रवेश केला. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत या नेत्यांचा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी स्वामी प्रसाद मौर्य आणि धर्मसिंह सैनी यांनी भाजप आणि योगी सरकारवर हल्लाबोल केला. यासोबत बसपा सुप्रीमो मायावती यांच्यावरही निशाणा साधला.

योगींच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले की, भाजपचा सफाया करून उत्तर प्रदेशला भाजपच्या शोषणातून मुक्त करायचे आहे. अखिलेश यांच्यासोबत मिळून भाजपचा नायनाट करू. अखिलेश तरुण-तडफदार आहेत. शिकलेले आहेत आणि त्यांच्यात नवीन ऊर्जा आहे. मौर्य यांनी मायावतींवरसुद्धा हल्लाबोल केला. ज्यांची साथ सोडतो, त्यांना काहीच पत्ता नसतो. बहनजी त्याचेच एक उदाहरण आहेत, असे ते म्हणाले.

आज सत्तेत आलेल्यांपैकी ५ टक्के लोक केवळ मलाई खातात. आता ८० आणि २० ची नाही, तर १५ आणि ८५ अशी लढाई आहे. ८५ आमचे आहेत आणि १५ मध्ये आधीच फूट पडली आहे. योगींनी दलित आणि मागास लोकांचा हक्क हिरावून उच्चवर्णीयांना दिला आहे, असा आरोपही मौर्य यांनी केला. भाजपचे आणखी एक मंत्री धर्मसिंह सैनी यांनी तर अखिलेश भावी नाही तर मुख्यमंत्रीच आहेत, असे म्हटले. दलित आणि मागास वर्गाने त्यांनाच मुख्यमंत्री बनवण्याचा संकल्प हाती घेतला आहे, असेही ते म्हणाले.

२ मंत्री, ६ आमदार आणि १२ माजी आमदार सपात
समाजवादी पार्टीचा लखनौमध्ये पक्षांतराचा खूप मोठा कार्यक्रम झाला. यावेळी सरकारमधील भाजपचे दोन मंत्री, ६ आमदार यांच्यासह १२ पेक्षा जास्त माजी आमदारांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला. समाजवादी पार्टीचे नेता आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत भाजपला सोडचिठ्ठी दिलेले स्वामी प्रसाद मौर्य, धर्मसिंह सैनी, भागवती सांगर आणि विनय शाक्य यांच्यासह अनेक आमदार आणि माजी आमदारांचा समावेश आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या