22.3 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeराष्ट्रीय...म्हणून किशोर यांचा काँग्रेस प्रवेश झाला नाही

…म्हणून किशोर यांचा काँग्रेस प्रवेश झाला नाही

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : प्रशांत किशोर आणि काँग्रेसची भागीदारीसाठी चर्चा सुरू होती. मात्र, ही भागीदारी होऊ शकली नाही. मला वाटते यामागे अनेक कारणे होती त्यामुळेच ही भागीदारी होऊ शकली नाही. काही कारणे त्यांच्याकडून होती, तर काही कारणे आमच्याकडून होती. मी त्याच्या तपशीलात जाऊ इच्छित नाही. काही मुद्यांवर सहमत होणे शक्य नव्हते. त्यामुळे भागीदारीची ही चर्चा पुढे जाऊ शकली नसल्याची माहिती खुद्द काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले होते. या काळात त्यांचे राहुल गांधी यांच्या घराजवळील फोटोही समोर आले. तसेच त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याशी गुप्त बैठक केल्याच्याही चर्चा होत्या. मात्र, नंतर प्रशांत किशोर यांनी सार्वजनिकपणे काँग्रेसच्या नेतृत्वावर हल्लाबोल करत काँग्रेस प्रवेशाचा निर्णय न झाल्याचे स्पष्ट संकेत दिले. यानंतर आता काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी या मुद्द्यावर बोलताना प्रशांत किशोर यांचा काँग्रेस प्रवेश का होऊ शकला नाही यावर भाष्य केले आहे.

प्रशांत किशोर यांचे आरोप फेटाळले
काँग्रेसमध्ये बाहेरच्या व्यक्तीला प्रवेश न देण्याचा मतप्रवाह असल्याने प्रशांत किशोर यांना पक्ष प्रवेश दिला नाही हा आरोप प्रियंका गांधी यांनी फेटाळला. असे असते तर प्रशांत किशोर यांच्यासोबत इतक्या पुढच्या स्तरावर चर्चा का झाली असती असा सवाल करत त्यांनी हे कारण नाकारले. प्रियंका गांधी यांनी प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाची शक्यता तयार झाली होती हेही मान्य केले. मात्र, काही कारणांमुळे तसे होऊ शकले नाही, असे नमूद केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या