23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeराष्ट्रीययंदा देशात फडकणार २० कोटी राष्ट्रध्वज!

यंदा देशात फडकणार २० कोटी राष्ट्रध्वज!

एकमत ऑनलाईन

हर घर तिरंगा मोहीम, १३ ते १५ ऑगस्टदरम्यान घरावर तिरंगा फडकविण्याचे आवाहन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सचा डीपी बदलला आहे. आता भारताचा राष्ट्रध्वज त्यांनी डीपी म्हणून ठेवला आहे. तसेच इतरांनीही डीपी बदलावा, असे आवाहन केले आहे. या योजनेअंतर्गत १३ ते १५ ऑगस्टदरम्यान प्रत्येक नागरिकाच्या घरावर तिरंगा फडकविण्याचे आवाहन करण्यात आले असून, या मोहिमेअंतर्गत देशात २० कोटींवर राष्ट्रध्वज फडकविण्याचे उद्दिष्ट आहे.

देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने हर घर तिरंगा योजना सुरू करण्यात आली. १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक नागरिकाने आपल्या घरी सलग ३ दिवस तिरंगा फडकवण्याचे त्यांनी सांगितले. रविवारी ३१ जुलै रोजी प्रसारित झालेल्या ९१ व्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी जनतेला २ ते १५ ऑगस्टपर्यंत आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सचा डीपी म्हणून तिरंग्याचा फोटो ठेवण्याचा आग्रह केला. पंतप्रधान मोदींसह गृहमंत्री अमित शहा यांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटचा डीपी बदलला आहे.

स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून हर घर तिरंगा उपक्रम साजरा होत आहे. हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात भारतीय राष्ट्रध्वज तयार केले जात आहेत. कामगारांकडून मोठ्या संख्येने राष्ट्रध्वज विक्रीसाठी बनवले जात आहेत. मुंबईत भारतीय ध्वज बनवणा-या कारखान्यांमध्ये विविध आकाराचे झेंडे तयार केले जात आहेत. अनेक कामगार मिळून मोठ्या संख्येत झेंडे बनवत आहेत. कारखान्यातून झेंडे विकत घेण्यासाठी अनेक दुकानदारही गर्दी करत आहेत.

गुवाहाटीतही स्वातंत्र्यदिनासाठी मोठी तयारी होत आहे. आसाम खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या कार्यालयात कामगार मोठ्या प्रमाणात राष्ट्रध्वज तयार करत आहेत. पंचायत, ग्रामविकास विभागाने झेंडे तयार करण्यासाठी बचत गटांची मदत घेतली आहे. आसाम सरकारने हर घर तिरंगा कार्यक्रमांतर्गत शहरे, ग्रामीण भाग, सरकारी संस्था, शाळा, महाविद्यालये, व्यावसायिक आस्थापनांवर तसेच जिल्हा-गाव पातळीवर दुकाने सुरू करुन १३ ते १५ ऑगस्टदरम्यान जवळपास ८० लाख राष्ट्रध्वज फडकवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

नवी दिल्लीसह सर्वत्र जंगी तयारी
नवी दिल्लीसह इतरत्रही भारतीय ध्वज मोठ्या संख्येने तयार होत आहेत. नवी दिल्लीतील सदर बाजार इथे भारताचा झेंडा तयार करणारे अब्दुल गफ्फार अन्सारी त्यांच्या कारखान्यात ते कामगारांसह भारतीय ध्वज तयार करत आहेत. जमशेदपूरमध्येही सखी मंडळाच्या कामागारांनी हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत भारतीय राष्ट्रध्वज विक्रीसाठी तयार केले आहेत. याशिवाय नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे २० हजार ध्वज तयार करण्यात येत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या