24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeराष्ट्रीययशवंत सिन्हांचा उमेदवारी अर्ज दाखल

यशवंत सिन्हांचा उमेदवारी अर्ज दाखल

एकमत ऑनलाईन

पात्र व्यक्तीनेच राष्ट्रपती भवनात जावे : सिन्हा
नवी दिल्ली : भाजपप्रणीत एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सोमवारी विरोधी पक्षांचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी कॉंग्रेस नेते राहुल गांधी, मल्लिकार्जु खरगे, राष्ट्रवादीचे शरद पवार, फारुख अब्दुल्ला, अखिलेश यादव, तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्यांसह अन्य पक्षांचे नेते उपस्थित होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना यशवंत सिन्हा यांनी राष्ट्रपती भवनात केवळ अशा व्यक्तीनेच जावे, जो या जबाबदा-या पार पाडू शकेल, असे नमूद केले. सिन्हा यांना एकूण १७ पक्षांचा पाठिंबा आहे.

राष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भाजप नेत्यांची योजना होती. त्यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांशी भाजप नेत्यांनी संपर्कही केला. परंतु अगोदरच प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षाचा उमेदवार देण्यासंबंधी बैठक बोलावली होती. या बैठकीत विरोधकांचा उमेदवार देण्याचे ठरले. त्यानंतर शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यामुळे राष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांच्यात लढत रंगणार आहे. या निवडणुकीत अद्याप वायएसआर आणि झारखंड मुक्ती मोर्चाने अद्याप आपला पाठिंबा जाहीर केलेला नाही. मात्र, मायावती यांच्या बहुजन विकास पार्टीने आणि बिजदने मुर्मू यांना पाठिंबा दर्शविला आहे.

सिन्हा यांना एमआयएमचा पाठिंबा
एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी २०२२ च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. ओवैसींनी ट्विट करून ही घोषणा केली. एआयएमआयएमचे आमदार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना मतदान करतील. याआधीही यशवंत सिन्हा माझ्याशी फोनवर बोलले होते, असेही ते म्हणाले.

टीआरएसही पाठीशी
उमेदवार बनवल्यापासून यशवंत सिन्हा यांनी पाठिंब्यासाठी अनेक पक्षांशी चर्चा केली. सोमवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या नेतृत्वाखालील तेलंगणा राष्ट्र समितीनेही त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या