22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeयूट्यूब स्टारने फॉलोअर्सला लावला ४३७ कोटींंचा चुना

यूट्यूब स्टारने फॉलोअर्सला लावला ४३७ कोटींंचा चुना

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : थायलंडच्या लोकप्रिय यूट्यूबरने तिच्या हजारो फॉलोअर्सना फॉरेक्स ट्रेडिंग स्कॅमद्वारे $५५ दशलक्ष (अंदाजे ४३७.६८ कोटी रुपये) चा चुना लावल्याचे आरोप करण्यात आले आहेत. गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचे आश्वासन देऊन ही फसवणूक केली.

नट्टामोन खोंगचक, जिला नुट्टी म्हणून ओळखले जाते, तिच्या युट्यूब चॅनेलचे ८,४७,००० हून सब्सक्रायबर्स आहेत. तसेच तिने इन्स्टाग्राम खात्यावर विदेशी मुद्रा व्यापा-यांसाठी खाजगी अभ्यासक्रमांची जाहिरात देखील केली. नुट्टीच्या जाळ्यात अडकून ६,००० हून अधिक लोकांनी गुंतवणुकीसाठी पैसे दिले.

मे मध्ये केलेल्या आपल्या शेवटच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये, नुट्टी म्हणाली होती की, तिच्याकडे गुंतवणूकदारांचे २७.५ मिलियन डॉलर देणे आहे. तसेच तिने दावा केला होता की, तिच्या ब्रोकरने मार्चपासून तिचे ट्रेडींग खाते आणि फंड ब्लॉक केला आहे.

मात्र ती गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी प्रयत्न करत आहे. थायलंड पोलिसांनी फसवणूक प्रकरणी नुट्टीविरोधात गेल्या आठवड्यात अटक वॉरंट जारी केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या