नवी दिल्ली : आगामी उत्तर प्रदेशातील विधानसभेची निवडणूक भारताचे भवितव्य ठरवेल असे, मत केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर देखील जोरदार हल्ला चढवला. शहा म्हणाले की, अखिलेश यांना निवडून आणणे म्हणजे उत्तर प्रदेशात गुंडा राज परत येणे होय असे शहा यावेळी म्हणाले. यूपी आज प्रगती करत असून, हे यूपीच भारताचे भवितव्य ठरवेल असा विश्वास शहा यांनी यावेळी व्यक्त केला. ते मथुरेत बोलत होते.
एक वेळ होती जेव्हा गुंड आणि गुन्हेगारांनी अशी दहशत पसरवली होती की राज्य पोलिसही त्यांना घाबरायचे. महिला आणि तरुणींना बाहेर पडण्याची भीती वाटत होती. पण आता ते बदलले आहे. गुंड आणि गुन्हेगार आता पोलिसांबद्दल इतके घाबरले आहेत की, ते स्वेच्छेने आत्मसमर्पण करत आहेत. आम्ही उत्तर प्रदेशला वंशवाद आणि जातीवादा पासून दूर नेले आहे आणि विकासावर लक्ष केंद्रित केले आहे.
प्रत्येकाचे वैयक्तिक आभार
अयोध्या आणि वाराणसीनंतर मथुरा हे राज्यातील तीन प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक आहे, त्याचाच एक भाग म्हणूनही शहा यांच्या या दौ-याकडे पाहिले जात आहे. दरम्यान, २०१४, २०१७ किंवा २०१९ मध्ये, येथे फक्त कमळ विजयी झाले आहे, असे सांगत मी तुमच्यापैकी प्रत्येकाचे वैयक्तिक आभार मानू इच्छितो असे शहा यांनी मथुरा वासियांना यावेळी सांगितले. तुम्ही उत्तर प्रदेश मजबूत करण्यात मदत केली असल्याचेही यावेळी शहा यांनी सांगितले.