नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. त्यातच आता भाजपसोबत आघाडी न झाल्याने भाजपचा मित्रपक्ष जेडीयूने स्वतंत्रपणे आपल्या उमेदवारांची घोषणा केली. आज जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार राजीव रंजन ऊर्फ ललन सिंह यांनी पत्रकार परिषद घेत जेडीयूच्या उत्तर प्रदेशमधील उमेदवारांची घोषणा केली.
यावेळी त्यांनी २६ उमेदवारांची घोषणा केली. जेडीयू नेत्यांनी आपण भाजपसोबत उत्तर प्रदेशात निवडणूक लढवू इच्छितो, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपच्या नेत्यांशी बोलून दाखविले होते. मात्र, प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगण्यात आले.