29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeराष्ट्रीययोगींकडून धर्माच्या प्रमाणपत्राची गरज नाही

योगींकडून धर्माच्या प्रमाणपत्राची गरज नाही

एकमत ऑनलाईन

लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून आपल्याला धर्माच्या प्रमाणपत्राची गरज नाही, अशी टीका काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी बुधवारी केली. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने महिलांसाठी वेगळा जाहीरनामा आणला आहे. जाहीरनाम्याचे प्रकाशन करताना त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर टीकास्त्र सोडले.

योगीजींना माहित आहे का मी कोणत्या मंदिरात जाते आणि कधीपासून जात आहे? त्यांना माहित आहे का की मी वयाच्या १४ व्या वर्षापासून उपवास करत आहे? ते मला माझ्या धर्माचे किंवा माझा कोणत्या धर्मावर विश्वास आहे, याचे प्रमाणपत्र देतील का? मला त्यांच्या कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नाही, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे. आम्हाला खरोखरच महिलांना सक्षम बनवायचे आहे, आम्ही राज्याच्या निवडणुकीत पक्षाची ४० टक्के तिकिटे महिलांसाठी राखून ठेवली आहेत. आम्हाला हे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत वाढवायचे आहे,असेही त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या