22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeमहाराष्ट्ररक्षकांना भक्षक बनवणारे धोरण स्वीकारले का?

रक्षकांना भक्षक बनवणारे धोरण स्वीकारले का?

एकमत ऑनलाईन

मुंबई : भाजपाच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहून अहमदनगर जिल्ह्यातील पीडित पारधी कुटुंबीयांची व्यथा मांडली आहे. दिवंगत आदिवासी सुमन काळे यांच्या मृत्यूप्रकरणाबाबत सरकार उदासीन असून वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप वाघ यांनी केला आहे. तसेच, राज्य सरकार उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत नसून पीडित कुटुंबीयांना न्याय देत नसल्याचेही वाघ यांनी म्हटले आहे.

पोलिस कस्टडीत मृत्यू पावलेल्या पारधी समाजातील सामाजिक कार्यकर्त्या सुमन काळे यांच्या प्रकरणाबाबत राज्य सरकारचे उदासीन, वेळकाढू आणि तितकेच अन्यायकारक धोरण आहे. गेल्या १४ वर्षांपासून त्यांना न्याय मिळवण्यासाठी लढा सुरू आहे. शेवटी १३ जानेवारी २०२१ रोजी मा. उच्च न्यायालयाने हा खटला सहा महिन्यांत संपवावा आणि पीडितेच्या कुटुंबाला ५ लाख नुकसानभरपाई ४५ दिवसांत देण्याचे आदेश दिले. परंतु, आपल्या सरकारने ना खटला पुढे नेला ना नुकसानभरपाई दिली.

ही अत्यंत गंभीर बाब आहे. यावरूनच सरकारच्या हेतूविषयी शंका घ्यायला वाव मिळतोय? सुमन काळेंना न्याय मिळाला तर प्रस्थापितांच्या यंत्रणेतील हितसंबंधांना बाधा येणार आहे का? असा सवाल आता सामाजिक क्षेत्रातून उपस्थित केला जात असल्याचे वाघ यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या