24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमहाराष्ट्ररतन टाटा यांना डॉक्टरेट

रतन टाटा यांना डॉक्टरेट

एकमत ऑनलाईन

मुंबई : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना त्यांच्या समाजातील योगदानाबद्दल महाराष्ट्रातील एचएसएनसी विद्यापीठाने मानद डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी प्रदान केली आहे. शनिवारी विद्यापीठाच्या विशेष दीक्षांत समारंभात महाराष्ट्राचे राज्यपाल आणि या विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी रतन टाटा यांना ही पदवी प्रदान केली.

यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, रतन टाटा हे केवळ उद्योगपती किंवा कॉर्पोरेट जगतातील एक आदर्श नाहीत, तर नम्रता, मानवता आणि मूल्यांना प्रोत्साहन देणारे एक महान व्यक्ती आहेत. रतन टाटा यांनी मानद पदवी स्वीकारुन विद्यापीठाचा तसेच उपस्थितांचा गौरव वाढवला. टाटा यांचा सन्मान हा संपूर्ण टाटा समूहाचा तसेच टाटा घराण्याचा सन्मान असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

रतन टाटा यांनी मानले आभार
यावेळी रतन टाटा यांनी आपल्या भाषणात विद्यापीठाचे आभार मानताना सांगितले की, हा सन्मान माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. एचएसएनसी समूह विद्यापीठ ही एक दूरदर्शी संकल्पना असून विद्यापीठांनी नीतिमत्ता व मानवी मूल्ये यांच्या वाटेने देशाला पुढे नेणारी सामर्थ्यशाली युवा पिढी घडवावी.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या