23.2 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeक्रीडारवी शास्त्रींना क्लीन चिट

रवी शास्त्रींना क्लीन चिट

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुलींनी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींना क्लीन चीट दिली आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी लंडनमधील पुस्तक प्रकाशन प्रकरणी रवी शास्त्री यांची बाजू घेतली आहे. त्यांनी या प्रकरणी रवी शास्त्रींवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले.

सौरभ गांगुली यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, चौथ्या कसोटीपूर्वी कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यासाठी बीसीसीआयची परवानगी घेतली नव्हती असे स्पष्ट केले. त्यांना या प्रकरणी रवी शास्त्री यांच्या विरुद्ध कोणती कारवाई करणार असे विचारले असता त्यांनी कोणतीही कारवाई करणार नाही असे उत्तर दिले. रवी शास्त्रींना सौरभ गांगुलींनी पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याप्रकरणी क्लीन चीट दिली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या