29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeक्रीडारहाणेकडे कर्णधारपद द्यायला हवे होते

रहाणेकडे कर्णधारपद द्यायला हवे होते

एकमत ऑनलाईन

मुंबई : भारतीय टीम आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या सीरिजमधील शेवटचा आणि निर्णायक सामना ११ जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळला जाणार आहे. पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर दुस-या कसोटीत भारताला पराभवाला सामोरे जावे लागलेय. दरम्यान दुस-या कसोटी सामन्यात के. एल. राहुल ऐवजी अजिंक्य रहाणेकडेच कर्णधारपदाची धुरा द्यायला हवी होती असे मत माजी खेळाडू वसिम जाफरने व्यक्त केले आहे.

दुस-या कसोटी सामन्यात माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे उपस्थित असतानाही के. एल. राहुलला कर्णधारपदाची धुरा देण्याच्या निर्णयावर भारताच्या जाफरने नाराजी व्यक्त केली आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रहाणेने कर्णधारपद स्वीकारायला हवे होते, असे जाफरने मत व्यक्त केले आहे.

कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिका जिंकली होती. दक्षिण आफ्रिका दौ-यापूर्वी खराब फॉर्ममुळे त्याला उपकर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले. मात्र, रहाणेने टीममधील स्थान कायम राखण्यात यश मिळवले. दुस-या कसोटीच्या पहिल्या डावात तो शून्यावर बाद झाला. तर दुस-या डावात ५८ धावा करत भारताला चांगली धावसंख्या गाठण्यास त्याने मदत केली.
एका आर्टिकलमध्ये जाफरने म्हटलेय की, मी टीम मॅनेजमेंटच्या निर्णयाने आश्चर्यचकित झालो आहे. जेव्हा तुमच्याकडे अजिंक्य रहाणेसारखा अनुभवी खेळाडू आहे, ज्याने कर्णधार म्हणून एकही कसोटी गमावली नाही आणि ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली. याची कल्पना असूनही राहुलला कसोटी कर्णधारपद देण्याची गरज आहे?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या