24.9 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeक्रीडारहाणेच्या खराब बॅटिंगने लाजिरवाणे रेकॉर्ड

रहाणेच्या खराब बॅटिंगने लाजिरवाणे रेकॉर्ड

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय कसोटी संघाचा फुल टाईम उपकर्णधार आणि सध्याचा (कानपूर कसोटी) कर्णधार अजिंक्य रहाणेचा खराब फॉर्म कायम आहे. कानपूरमध्ये न्यूझिलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुस-या डावातही त्याची बॅट शांतच राहिली. कानपूर कसोटीच्या दुस-या डावात एका चौकाराच्या मदतीने १५ चेंडूत चार धावा केल्यानंतर तो डावखुरा फिरकी गोलंदाज एजाज पटेलच्या गोलंदाजीवर पायचित झाला. तर पहिल्या डावात तो ३५ धावा करून काईल जेमिसनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला होता. अशा प्रकारे त्याने पुन्हा एकदा निराशा केली आहे.

डिसेंबर २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटीत शतक झळकावल्यानंतर अजिंक्य रहाणेला एकही शतक झळकावता आलेले नाही. त्यामुळे त्याच्या टीम इंडियातील जागेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे मुंबई कसोटीत त्याला संधी मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. भारतीय कसोटी संघाचा फुल टाईम उपकर्णधार आणि सध्याचा (कानपूर कसोटी) कर्णधार अजिंक्य रहाणेचा खराब फॉर्म कायम आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या