नवी दिल्ली : वृत्तसंस्था
स्वातंत्र्य दिवस आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त वर्षातून दोन वेळा देशाची राजधानी नवी दिल्लीतील राजपथावर भारतीय लष्कराच्या विविध दलांचे पथसंचलन करीत देशाच्या लष्करी ताकदीचे दर्शन घडविले जाते. प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनाला आतापर्यंत ब्रिटीश बनावटीच्या फौैजांची ताकद दिसून यायची. मात्र देशाच्या इतिहासात प्रथमच यंदाच्या पथसंचलनात ब्रिटींशांएवजी स्वदेशी बनावटीच्या भारतीय फौजा सलामी देणार आहेत.
प्रजासत्ताक दिनी जेव्हा सर्वोच्च सेनापती ध्वजारोहण करतात तेव्हा २१ तोफांची सलामी दिली जाते. ७ तोफा राष्ट्रगीत होण्याच्या ५२ सेकंदात २१ वेळा फायरींग करतात. यंदा हा आवाज ब्रिटीश तोफांचा नाही तर स्वदेशी तोफांचा असेल.
राजपथावर ब्रिटीश २५ पाउंडरच्या जागेवर स्वदेशी १०५ मिमी इंडियन फील्ड गन त्या जागी असतील. दिल्ली एरियाचे चीफ ऑफ स्टाफ मेजर जनरल भवनीश कुमार यांनी सांगितलं की, यंदा राजपथावर भारतीय सेनेच्या स्वदेशी ताकदीला सादर करेल.
अशा आहेत ब्रिटीश २५ पाउंडर गन तोफा
भारतीय सैन्याने १९४७, १९६५ आणि १९७१ च्या युध्दात पाकिस्तान विरुध्द लढताना या तोफांचा प्रत्यक्ष रणभूमीवर वापर केला होता. तर १९६२ च्या युद्धात चीनच्या विरुध्द युद्धातही या तोफांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. या तोफा ९० च्या दशकाच्या लष्करी सेवेतून निवृत्त करण्यात आल्या होत्या. त्यांच्या जागी स्वदेशी १०५ मिमी इंडियन फील्ड गन (तोफ) आणली गेली. या तोफेचे नाव २५ पाउंडर आहे. याचा अर्थ असा की, ८८ मिमी कॅलिबरच्या तोफेतून डागला जाणारा गोळा २५ पाउंडचा असतो.
राजपथावर स्वदेशी ताकद
राजपथावरुन यंदा प्रथमच लष्कराची स्वदेशी ताकद जगाला दिसणार आहे. यंदा प्रजासत्ताक दिनी स्वदेशी तोफा २१ तोफांची सलामी देणार आहेत. यात भारतीय सैन्याचे जितकी शस्त्र ताकद आहे, त्याचेही प्रदर्शन भरवण्यात येइल. यात अर्जून टँक, नाग मिसाइल, बीएमपी -२, ‘-९ वज्र, शॉर्ट स्पॅम ब्रिज, आर्मी एयर डिफेंस आकाश मिसाइल, आर्मी एव्हिएशन कोरचे तीन रुद्र, ध्रुव यांचा समावेश असेल.