23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeक्रीडाराजस्थानचा शानदार विजय, गुजरातशी क्वॉलिफायर लढत

राजस्थानचा शानदार विजय, गुजरातशी क्वॉलिफायर लढत

एकमत ऑनलाईन

मुंबई : अखेरच्या साखळी सामन्यात अश्विनच्या अष्टपैलू खेळीच्या बळावर राजस्थानने चेन्नईचा पाच विकेटने पराभव केला. अश्विनने गोलंदाजीत महत्वाची एक विकेट घेतली, तर फलंदाजीमध्ये नाबाद ४० धावांची खेळी केली आणि चेन्नईने दिलेले १५१ धावांचे आव्हान राजस्थानने पाच गड्यांच्या मोबदल्यात यशस्वी पार केले. या विजयासह राजस्थानच्या संघाने गुणतालिकेत टॉप २ मध्ये प्रवेश केला. २४ मे रोजी राजस्थान आणि गुजरात संघामध्ये क्वालिफायर १ चा सामना होणार आहे.

१५१ धावांचा आव्हान पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात खराब झाली. तुफान फॉर्मात असलेला जोस बटलर अवघ्या दोन धावा काढून माघारी परतला. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसनही १५ धावा काढून बाद झाला. देवदत्त पडिकल तीन धावा काढून बाद झाला. पण त्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि आर. अश्विन यांनी डाव सावरला. जोडी जमली असे वाटत असतानाच ५९ धावांवर यशस्वी बाद झाला. यशस्वीने संयमी फलंदाजी करत संघाचा डाव सावरला. यशस्वी बाद झाल्यानंतर आर. अश्विनने सामन्याची सर्व सूत्रे आपल्याकडे घेतली. अश्विनने रियान परागसोबत राजस्थानला विजय मिळवून दिला. अश्विन आणि रियान पराग यांनी २० चेंडूत ३९ धावांची भागिदारी केली. अश्विनने नाबाद ४० धावांची खेळी केली. रियान पराग १० धावांवर नाबाद राहिला.

अखेरच्या साखळी सामन्यात चेन्नईचा कर्णधार एम. एस. धोनीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मोईने अलीच्या ९३ धावांच्या वादळी खेळीच्या बळावर निर्धारित २० षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात चेन्नईने केवळ १५० धावा केल्या. सलामीवीर ऋतुराज स्वस्तात बाद झाला. कॉन्वेही १६ धावा करण्यातच यशस्वी झाला. मोईने अलीने सुरुवातीपासून दमदार फलंदाजी सुरु ठेवली. पण त्याला खास कोणाचीच साथ मिळाली नाही. केवळ धोनीने २६ धावांची खेळी केली, इतर फलंदाज दुहेरी आकडेवारीही गाठू शकले नाहीत.

चेन्नईचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद झाले. ऋतुराज गायकवाड २, डेविन कॉन्वे १६. एन जगदीशन १, अंबाती रायडू ३, धोनी २६ यांना मोठी खेळी करता आली नाही. राजस्थानकडून सर्वच गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. पण ओबेद मेकॉयने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत ४ षटकात २० धावा देत २ विकेट्स नावे केल्या आहेत. तर चहलनेही दोन तर आश्विन आणि बोल्टने प्रत्येकी एक विकेट घेतली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या