22.3 C
Latur
Wednesday, August 17, 2022
Homeक्रीडाराजस्थान रॉयल्सचा थरारक विजय

राजस्थान रॉयल्सचा थरारक विजय

एकमत ऑनलाईन

मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ३० वा सामना चांगलाच अटीतटीचा झाला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने २१७ धावांचा डोंगर उभारूनही केकेआरने त्यांना चांगली टक्कर दिली. विजयासाठी २१८ धावा करण्यासाठी केकेआरने पूर्ण ताकतीने फलंदाजी केली. मात्र राजस्थानच्या युजवेंद्र चहलने हॅट्ट्रिकसह एकूण पाच बळी घेतल्यामुळे कोलकाता संघ खिळखिळा झाला. परिणामी राजस्थानचा सात धावांनी विजय झाला. जोस बटरलने १०३ धावांची शतकी खेळी केल्यामुळे राजस्थान २१७ धावा उभारू शकला. केकेआरला शेवटचा फलंदाज बाद होईपर्यंत २१० धावा करता आल्या.

राजस्थान आणि केकेआर यांच्यात अटीतटीची लढत झाली. राजस्थानने दिलेल्या २१८ धावांचे आव्हान गाठण्यासाठी फलंदाजीसाठी आलेल्या केकेआरची सुरुवात खराब झाली. पहिल्या षटकाच्या पहिल्याच चेंडूमध्ये सुनिल नरेन धावबाद झाला. गरज नसतानाही चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे नरेनचा बळी गेला. त्यानंतर अरॉन फिंच आणि श्रेयस अय्यर या जोडीने मैदानावर जम बसवला. फिंचने अर्धशतकी खेळी करत २८ चेंडूंमध्ये ९ चौकार आणि २ षटकार लगावत ५८ धावा केल्या. मात्र नवव्या षटकात प्रसिद कृष्णाच्या चेंडूचा सामना करताना तो झेलबाद झाला.

दुस-या विकेटसाठी आलेल्या केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरनेदेखील मोठी खेळी केली. त्याने अवघ्या ५१ चेंडूंमध्ये अर्धशतकी खेळी करत सात चौकार आणि चार षटकार लगावत ८५ धावा केल्या. श्रेयस अय्यरने १७ व्या षटकापर्यंत किल्ला लढवला. मात्र चहलच्या चेंडूचा सामना करताना तो झेलबाद झाला. तिस-या विकेटसाठी आलेला नितिश राणा चांगली खेळी करु शकला नाही. १८ धावा करुन तो झेलबाद झाला. त्यानंतर मात्र केकेआरचे सर्वच फलंदाज आश्चर्यकारित्या बाद होत गेले. १७ व्या षटकात युजवेंद्र चहलने केकेआरच्या फलंदाजांना पळता भुई थोडी केली. या षटकात चहलने एकापाठोपाठ तीन विकेट घेत हॅट्ट्रिक नोंदवली.

चहलने टाकलेल्या १७ व्या षटकात श्रेयस अय्यर (८५), शिवम मावी (०), पॅट कमिन्स (०) हे गडी एकापाठोपाठ बाद झाले. त्यानंतर सामना केकेआरच्या हातातून गेल्याचे दिसत असताना शेवटच्या फळीतील उमेश यादवने सामन्याला कलाटणी दिली. त्याने १८ व्या षटकात दोन षटकार आणि एक चौकार लगावत सामना फिरवला. १६ चेंडूंमध्ये ३१ धावांची गरज असताना उमेशने धडाकेबाज फलंदाजी करत १३ चेंडूंमध्ये १८ धावा अशी स्थिती करून ठेवली. शेवटच्या सहा चेंडूमध्ये केकेआरला ११ धावांची गरज होती. मात्र दुस-याच चेंडूवर शेल्डन जॅक्सन झेलबाद झाला आणि केकेआरची विजयाची आशा मावळली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या