16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeराष्ट्रीयराज्यपालांना कुलपती पदावरून हटवणार केरळ सरकार

राज्यपालांना कुलपती पदावरून हटवणार केरळ सरकार

एकमत ऑनलाईन

थिरुवनंतपूरम : केरळचे राज्यपाल आरीफ मोहम्मद खान आणि राज्य सरकारमध्ये सुरू असलेल्या वादात बुधवारी आणखी एका निर्णयाने तेल ओतले. राज्यपालांना कुलपती पदावरून हटविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने हा वाद पुन्हा न्याय दरबारी पोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

केरळ मंत्रिमंडळाने बुधवारी राज्यपाल खान यांना कुलपती पदावरून हटवण्यासाठी अध्यादेश आणण्याचा निर्णय घेतला. राज्य मंत्रिमंडळ कुलपतींच्या जागी तज्ज्ञ नियुक्त करण्याच्या तयारीत आहे. राज्यपाल खान यांनी ११ विद्यापीठांच्या कुलगुरूंना राजीनामा मागितल्यापासून हा वाद उफाळून आला आहे.

येत्या अधिवेशनात होणार शिक्कामोर्तब

केरळच्या राज्यपालांना कुलपती पदावरून हटवण्यासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय विधीमंडाच्या हिवाळी अधिवेशनात घेतला जाणार आहे. त्यांच्या जागी तज्ज्ञांची नियुक्ती सरकार करणार आहे. केरळ उच्च न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत, कुलगुरूंवर कोणतीही कारवाई करू नये, असे निर्देश राज्यपालांना दिले होते.

तीन दिवसांची मुदत

न्यायमूर्ती देवन रामचंद्रन यांनी राज्यपालांना आपली बाजू मांडण्यासाठी ३ दिवसांची मुदत दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ नोव्हेंबर ला होणार आहे. राज्यपालांनी बजावलेली कारणे दाखवा नोटीस बेकायदेशीर आणि अवैध असल्याचा दावा कुलगुरूंनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेतून केला आहे.

नियुक्तीला स्थगिती देण्यास न्यायालयाचा

राज्यपालांनी तिरुवनंतपुरम येथील ए.पी.जे. अब्दुल कलाम टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे प्रभारी कुलगुरू म्हणून सिझा थॉमस यांची नियुक्ती केली होती. मुख्यमंत्री पिनाराई विजयन सरकारने या नियुक्तीला स्थगिती देण्याची विनंती केली होती. मात्र, न्यायालयाने त्यास नकार दिला होता.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या