29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeराष्ट्रीयराज्यसभा कामकाजावर विरोधकांचा आज बहिष्कार

राज्यसभा कामकाजावर विरोधकांचा आज बहिष्कार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पावसाळी अधिवेशनातील गदारोळानंतर चालू अधिवेशनाच्या प्रारंभीच राज्यसभेतील १२ खासदारांचे निलंबन करण्यात आले होते. त्यावरुन विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली असून, बुधवार दि. ८ डिसेंबर रोजी विरोधकांकडून राज्यसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवार दि. ७ डिसेंबर रोजी येथे दिली.

निलंबित १२ खासदारांमध्ये शिवसेनेचे २, काँग्रेसचे ६ व तृणमूल काँग्रेसचे २ खासदार आहेत. शिवसेनेच्या खासदारांच्या निलंबनावरुन शिवसेना आक्रमक झाली आहे. समान विचारधारेचे विरोधी पक्ष एकत्र येत राज्यसभेच्या बुधवारच्या कामकाजावर बहिष्कार टाकणार आहेत, असे राऊत यांनी सांगितले. संसदेत विरोधी पक्षांनी विविध मुद्यांवरुन सरकारला घेरत मंगळवारी मोठा गदारोळ केला. काही काळ राज्यसभेचे कामकाजही स्थगित करण्यात आले. तशीच शक्यता बुधवारीही असून संसदेत विविध मुद्यावरून गदारोळ होण्याची शक्यता आहे.

शरद पवार यांचा आंदोलक खासदारांना पाठिंबा
निलंबित खासदारांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पोहोचले. शरद पवारांसोबत यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. राज्यसभेतून निलंबित केलेल्या १२ सहकारी खासदारांना आपण आज भेटलो. तसेच त्यांना आपला पाठिंबा दिला. या खासदारांचे निलंबन मागे घेण्यासाठी आम्ही एकजुटीने त्यांच्यासोबत उभे आहोत, असे शरद पवार त्यानंतर ट्विटमध्ये म्हटले.

खासदारांचे निलंबन लोकशाहीविरोधी
राज्यसभेतील खासदारांचे निलंबन हे घटनाबा आणि लोकशाहीविरोधी आहे. संसदेच्या गेल्या पावसाळी अधिवेशनात त्यांनी गदारोळ घातला होता. पण या हिवाळी अधिवेशनात त्यांना निलंबित केले गेले. अधिवेशनाचे कामकाज विस्कळीत होण्यास सरकार जबाबदार आहे, असे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या