27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeलातूरराज्यसभेत भाजपासोबत जाण्याचा विषय नाही

राज्यसभेत भाजपासोबत जाण्याचा विषय नाही

एकमत ऑनलाईन

एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी
लातूर : महाराष्ट्रात होत असलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत एमआयएम पक्षाची महत्वाची भूमिका राहणार आहे. एमआयएमच्या २ आमदारांचे मत कोणाला द्यायचे, हा निर्णय आम्ही अद्यापही घेतलेला नाही. परंतु ते बोलतील, तर आम्ही बोलू. मात्र भाजपसोबत जाण्याचा आमचा विषय नाही, असे एमआयएम पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मंगळवारी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितले.

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील ६ जागांसाठी येत्या १० जून रोजी मतदान होणार आहे. भाजपाने तिसरा उमेदवार मैदानात उतरवल्यामुळे या निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे. एक एक आमदार आपल्या बाजूने वळविण्याचा महाविकास आघाडी व भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रात एमआयएमचे २ आमदार आहेत. या निवडणुकीत ही दोन मते कोणला, असा प्रश्न विचारला असता खा. ओवेसी यांनी एमआयएमच्या २ आमदारांच्या मतदारसंघातील स्थानिक विकास निधी, अल्पसंख्याकांचे काही विषय आहेत. ते प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत. दुसरीकडे भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही, असे म्हटले.

खा. ओवेसी यांनी पत्रकार परिषदेत देशातील सध्याचे राजकारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती या विषयी जोरदार टीका केली. कानपूरमध्ये दगडफेकीची जी घटना घडली, ती एकतर्फी दाखवली जात आहे. वास्तवात दोन्ही समाजाकडून दगडफेक झालेली असताना विशिष्ट समाजाला टार्गेट केले जात आहे. एकतर्फी कारवाई केली जात आहे., असे म्हटले. या पत्रकार परिषदेस एमआयएमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष इम्तियाज जलील व लातूर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. मोहंमदअली शेख यांची उपस्थिती होती.

द्वेष पसरवून तरुणांना
भडकविण्याचा प्रयत्न
देशात बेकारी, शेतक-यांचे प्रश्न, उद्योग, व्यवसायाचे प्रश्न, असताना धार्मिक द्वेष पसरवून तरुणांना वेगळ्या मार्गाने घेऊन जाण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न होत आहे. धार्मिकतेवर राजकारण होऊ नये, परंंतु तसे होताना दिसत आहे. देशाचे संविधान सर्वोच्च आहे. हे विसरले जात आहे. भारतासारख्या विविध संस्कृतीने नटलेल्या देशाला समान नागरी कायद्याची गरजच नाही, असेही ते म्हणाले.

नुपूर शर्मा व नवीन कुमार
जिंदाल यांना अटक करा
प्रेषित मोहंमद (स.) यांच्याबाबत अवमानकारक टिप्पणीप्रकरणी देशाच्या पंतप्रधानांनी नुपूर शर्मा व नवीनकुमार जिंदाल यांच्यावर जी कारवाई केली, ती धुळफे क आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी. तसेच राज्य सरकारनेही पुढाकार घेऊन शर्मा व जिंदाल यांना अटक करावी, अशी मागणी खा. ओवेसी यांनी केली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या