26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeलातूरराज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांचे शुक्रवारी वितरण

राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांचे शुक्रवारी वितरण

एकमत ऑनलाईन

लातूर : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही शुक्रवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. कथा, कादंबरी, कविता, आत्मकथन, बाल साहित्यासाठी प्रत्येकी प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येते. साहित्य अकादमीचे राज्यस्तरीय पुरस्कार वितरणाचे हे १३ वे वर्ष आहे.

येथील भालचंद्र ब्लड बँक येथे सकाळी ११.३० वाजता आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी लातूरचे अध्यक्ष अ‍ॅड. एस. एन. बोडके हे राहणार आहेत, तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्यमंत्री संजय बनसोडे, खा. सुधाकर शृंगारे, महापौर विक्रांत गोजमगुंडे, ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य नागोराव कुंभार आदींची उपस्थिती राहणार आहे. यावेळी लातूर : वसा आणि वारसा या ग्रंथाच्या निर्मितीबद्दल उल्लेखनीय सामाजिक कार्य करणारे प्रा. डॉ. जयद्रथ जाधव यांचा आणि माय-बापासाठी कर्मचा-यांच्या वेतनातून अनुदान देणारे प्रा. गोविंद घार यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमीस देणगी देणा-या दात्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते मेजर उमाजी कांबळे लिखित शकुंतला आणि अ‍ॅड. एस. एन. बोडके लिखित लोकशाहीची ५० वर्षे एक चिंतन या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अकादमीचे अध्यक्ष अ‍ॅड. एस. एन. बोडके, कार्याध्यक्ष प्रा. श्रीधर गायकवाड, सचिव प्रकाश घादगिने, अर्जुन कांबळे, शिवाजी गायकवाड, डॉ. संजय जमदाडे, सौ. कुसुमताई दोडके, सौ. वंदना गादेकर, प्राचार्य डॉ. माधवराव गादेकर, आर. पी. गायकवाड, अ‍ॅ. अंगद गायकवाड आदींनी केले आहे.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या