24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यातील सत्तानाट्य सुप्रीम कोर्टात

राज्यातील सत्तानाट्य सुप्रीम कोर्टात

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील वातावरण ढवळून गेले आहे. महाराष्ट्रातील सत्तानाट्य आता सुप्रीम कोर्टात पोहोचले आहे. महाराष्ट्रातील कोणताही नेता हे प्रकरण सुप्रीम कोर्टात घेऊन गेलेला नाही. मध्य प्रदेशातीत काँग्रेसच्या महिला नेत्याने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत मोठी मागणी केली आहे.

सुप्रीम कोर्टाने जे आमदार राजीनामा देतील आणि निलंबित होतील, त्यांना पुढील पाच वर्षांसाठी निवडणूक लढवता येऊ नये, अशी मागणी जया ठाकूर यांनी केली आहे. आमदारांचे निलंबन आणि राजीनामा दिल्याच्या तारखेपासून त्याला पुढील पाच वर्षांसाठी निवडणूक लढवण्यापासून प्रतिबंधित करण्यात यावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

जया ठाकूर यांनी यापूर्वी सुप्रीम कोर्टात यापूर्वीच याचिका दाखल केली आहे. राज्यघटनेच्या १० व्या अनुसूचीप्रमाणे आमदारांना शिस्तभंगाच्या कारवाईद्वारे पद गमवावे लागले. ज्या कालावधीसाठी त्यांना निवडून देण्यात आले आहे. त्यापूर्वी त्यांनी राजीनामा दिल्यास त्यांना पुढील पाचवर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घालावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

जया ठाकूर यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात जानेवारी २०२१ पासून सुनावणी होते आहे. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता जया ठाकूर यांनी पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. केंद्र सरकार, भारत निवडणूक आयोगाने माझ्या याचिकेवर त्यांची भूमिका मांडणारी प्रतिज्ञापत्र सादर केले नसल्याचे म्हटले.

पक्ष बदलणे, राजीनामा देणे यासंदर्भातील कठोर नियम नसल्यानं राजकीय पक्ष जनतेने निवडून दिलेलं सरकार पाडण्यासाठी त्याचा गैरवापर करत असल्याचे म्हटल आहे. जया ठाकूर यांनी यासंदर्भात देशात आणि विविध राज्यात हे घडत असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रात असा प्रकार १८ जूनपासून सुरु झाला असून तो आजदेखील सुरु असल्याचे म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या