22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यात अनेक भागात पावसाची हजेरी

राज्यात अनेक भागात पावसाची हजेरी

एकमत ऑनलाईन

पुणे : अधूनमधून जाणवणारा उकाडा आणि आल्हाददायक थंडीची हजेरी लागत असताना अनपेक्षितरीत्या अवेळी पावसाचे आगमन झाल्याने वातावरणाचा एकूण नूरच पालटला आहे. दरम्यान येत्या ४८ तासांत राज्याच्या विविध भागात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे .

अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळ २४ तासांत कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून बंगालच्या उपसागरात येत्या दोन-तीन दिवसांत चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मंगळवारपासून राज्याच्या काही भागात ढगाळ हवामान होते तर रात्री वातावरणात गारवा जाणवत होता. ऐन थंडीच्या कालावधीत होत असणा-­या बदलामुळे वातावरणात बदल झाला आणि बुधवारी पहाटेपासून पावसाने हजेरी लावली.

अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची आणि चाकरमान्यांची मात्र तारांबळ उडाली. पुण्यासह राज्याच्या अन्य भागात पावसाने हजेरी लावली आहे. पुण्याच्या विविध भागात आणि पिंपरी-चिंचवड परिसरात आणि जिल्ह्यामध्ये रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाचा रब्बी पिकावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र या पावसाने थंडीमध्ये काहीशी वाढ झाली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या