22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यात आजही मुसळधार!

राज्यात आजही मुसळधार!

एकमत ऑनलाईन

मुंबई, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई : मागील २४ तासात पुणे, कोल्हापूर, साता-यासह राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं तर शहरात सखल भागात पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं. दरम्यान आजही राज्यातल्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

शिवाय पुढचे पाच दिवस महाराष्ट्रात पावसाची स्थिती कायम राहणार आहे. पुणे विभागातील हवामान खात्याचे प्रमुख के. एस. होसळीकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. पुणे, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात आज ही मुसळधार पावसाची परिस्थिती राहील तसेच पुढचे २ दिवस पुण्यासह राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

त्याचबरोबर आज (१२ सप्टेंबर) पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रायगड या जिल्ह्याला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर या भागात मुसळधार पावसाची शक्यता असून ठाणे, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, जालना, औरंगाबाद, जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलढाणा, अकोला, वाशिम, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या भागांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात जो कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे तो आता तीव्र झाला आहे. त्यामुळे मॉन्सून सक्रिय राहील असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मच्छीमार बांधवांनी मासेमारीसाठी अरबी समुद्रात जाऊ नये असे आवाहनही हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या