29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यात पुन्हा ‘अवकाळी’ संकट

राज्यात पुन्हा ‘अवकाळी’ संकट

एकमत ऑनलाईन

पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात सर्वत्र ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. तसेच अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात अवकाळी पाऊस कोसळला आहे. अवेळी पडणा-या या पावसामुळे राज्यातील शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार होते आहे. याचा जबरदस्त फटका रबी पिकांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतक-यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

अलीकडेच कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, ऊस या प्रमुख पिकांना मोठा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे गव्हाचे पिक भुईसपाट झाले होते. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. यानंतर आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आल्याने शेतक-यांच्या चिंतेत भर पडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात ढगाळ हवामानाची नोंद झाली आहे. त्यामुळे पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव होण्याची भीतीही शेतक-यांना सतावत आहे.

अनेक जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’
हवामान खात्याने पुण्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने पुण्यासह, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे, औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे.

३० डिसेंबरपासून पुढील तीन दिवस मुसळधार
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि सध्या दक्षिण अंदमान समुद्रात निर्माण होत असलेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे. त्यामुळे ३० डिसेंबरपासून पुढील तीन दिवसांमध्ये राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या