19 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यात मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता; उद्धव ठाकरेंचे भाकित

राज्यात मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता; उद्धव ठाकरेंचे भाकित

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता असल्याचे भाकित शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी केले आहे. शिवसेनेच्या संपर्कप्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.

शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी याबाबत माहिती दिली. कायंदे म्हणाल्या, आपल्याला माहिती आहे की, शिवसेनेची पहिल्यापासूनची बांधणी अशी आहे की, मुंबईतले जे पदाधिकारी असतात त्यांना जे पक्षाचे महत्त्वाचे निरोप असतात ते संपर्कप्रमुखांना पाठवले जातात.

त्यानुसार आजची बैठक झाली. पंतप्रधानांनी महाराष्ट्रासाठी काही खास पॅकेज जाहीर केले आहेत. यामुळे महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूक जाहीर होण्याची शक्यता उद्धव ठाकरेंनी वर्तविली आहे. कायमचे महाराष्ट्र-गुजरात असा वाद निर्माण करून भाजपकडून मतांचे राजकारण केले जात आहे, असा आरोपही यावेळी कायंदे यांनी केला आहे.

शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के म्हणाले, एकूण परिस्थिती पाहता शिवेसेनेचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. पण आता जनतेत काम करणारी मंडळी कोणीच शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे शिवसेना आता द्विधा मन:स्थितीत आहे, त्यामुळे आपले कार्यकर्ते टिकवून ठेवण्यासाठी अशा प्रकारची वातावरणनिर्मिती करायचे काम सध्या उद्धव ठाकरे गटाकडून केले जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या