29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यात शाळा १ डिसेंबरला सुरु होणार

राज्यात शाळा १ डिसेंबरला सुरु होणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यातील सर्व शाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतला होता. कोरोनाचा नवा विषाणू ओमिक्रॉनने सध्या संपूर्ण जगभरात दहशत निर्माण केली आहे. मागील अनुभव पाहता सर्व देशांनी पूर्वकाळजी घेत निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारनेही विदेशी प्रवाशांसाठी नियमावली जाहीर केली असून सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. दुससरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी झालेल्या बैठकीत केंद्राच्या आदेशाची वाट न पाहता कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या सर्व घडामोडींदरम्यान १ डिसेंबरपासून शाळा सुरु होणार असल्याने पालक चिंतेत आहेत. दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबद्दल महत्वाची माहिती दिली आहे.

चिंता बाळगण्याची गरज नाही
राजेश टोपे यांना १ डिसेंबरपासून शाळा सुरु होणार का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, ‘अजून ओमिक्रॉनसंबंधी आपल्या राज्याला अद्याप भीती नाही, कारण त्याची लागण झालेली कुठे दिसत नाही. त्यामुळे एकदम चिंता बाळगण्याची गरज नाही. शाळा ठरल्याप्रमाणे १ डिसेंबरला सुरु होईल’’.

मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
मास्क वापरणे गरजेचे आहे असे सांगत ओमिक्रॉनची लागण होण्याची गती सध्याच्या व्हेरियंटपेक्षा ५ पटीने जास्त आहे अशी माहिती राजेश टोपे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर दिली. यापुढे केंद्राने सांगितलेल्या १३ देशातून येणा-या प्रवाशांना थेट विमानतळावर क्वारंटाईन केले जाणार असून आरटीपीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह असल्याशिवाय विमान प्रवास करता येणार नाही असाही निर्णय घेतल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

आरटीपीसीआर चाचणी
औरंगाबाद, मुंबई, नागपूर पुणे या विमानतळावर देखील प्रवाशांच्या चाचण्या घेतल्या जातील असंही टोपे यांनी सांगितले. मुंबईहून दिल्लीला जायचं असेल आणि तिथून पुन्हा मुंबईला यायचे असेल तरीही आरटीपीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह असायला हवा अशी माहिती देखील टोपे यांनी दिली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या