27.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यात २ दिवसांत कडाक्याची थंडी

राज्यात २ दिवसांत कडाक्याची थंडी

एकमत ऑनलाईन

मुंबई : अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गेली काही दिवस महाराष्ट्रासह दक्षिण भारतात जोरदार पाऊस कोसळला. दरम्यान बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या जवाद चक्रीवादळाचा भारताच्या पूर्व किनारपट्टीला चांगलाच फटका बसला आहे.

पण गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात पाऊस पूर्णपणे थांबला आहे. पण येत्या दोन दिवसांत राज्यात कडाक्याची थंडी वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. सध्या हिमालयात पश्चिमी चक्रवात परिस्थिती निर्माण झाली आहे. थंडगार वारे हिमालयाकडून महाराष्ट्राच्या दिशेनं वाहण्यास सुरुवात झाली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या