23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यात ३ पोलिसांना राष्ट्रपती पोलिस पदक

राज्यात ३ पोलिसांना राष्ट्रपती पोलिस पदक

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्रातील ३ पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर झाले आहे. उत्कृष्ट सेवेसाठी पोलिसांचा हा सन्मान करण्यात आला आहे. या तीन पदकांसह राज्याला 84 पोलीस पदके मिळाली आहेत. पोलीस पदकांची आज घोषणा झाली आहे. मुंबई मुख्यालयात कार्यरत असलेले राज्य अन्वेशन विभागाचे सह आयुक्त सुनिल कोल्हे, ठाणे शहराचे सहायक पोलिस आयुक्त प्रदीप कन्नाळू आणि मुंबई ओसीवाडा पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर धनावडे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे.

महाराष्ट्रासाठी ८४ पदके जाहीर झाली आहेत. यातील तीन पोलीस अधिका-यांना उत्कृष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर झाली असून ४२ पोलिसांना शौर्य पदक तर प्रशंसनीय सेवेसाठी ३९ ‘पोलीस पदके’ जाहीर झाली आहेत.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालयाकडून दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलिस पदक जाहीर करण्यात येतात. यावर्षी देशभरातील अधिका-यांना १०८२ पोलीस पदक जाहीर झाली असून ८७ पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक, ३४७ पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’ आणि ६४८ पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला ८४ पदक मिळाली आहेत.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या