औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १ मे रोजी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेणार असल्याची घोषणा केली. मात्र, या घोषणेआधीच मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानाचे बुकिंग केले आहे. राज ठाकरे यांनी आपल्या राजनीतिचा नमुना सादर केला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ठाण्यातील सभेच्या वेळी झालेली पुनरावृत्ती टाळण्याचा प्रयत्न औरंगाबादमधील मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
मनसेची उत्तर सभा ठाण्यामध्ये झाली. ठाण्यात काही लोकांनी मैदान मिळू दिले नाही असा आरोप मनसेचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी केला, याचीच पुनरावृत्ती औरंगाबादमध्ये होऊ नये याची काळजी आम्ही घेतल्याचे त्यांनी सांगितले. मनसे कार्यकर्त्याने घोषणा यापूर्वीच औरंगाबादेतील मराठवाडा सांस्कृतिकमंडळाचे मैदान एक तारखेच्या सभेसाठी बुक करून ठेवले होते. त्यासाठीची आवश्यक रक्कमदेखील जमा करण्यात आली असल्याचे समोर आले आहे.