22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeमहाराष्ट्रराज ठाकरे यांना प्रतिबंधात्मक नोटीस

राज ठाकरे यांना प्रतिबंधात्मक नोटीस

एकमत ऑनलाईन

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यासंदर्भात ४ तारखेपर्यंतचा अल्टीमेटम दिला होता. या अल्टीमेटमवर राज ठाकरे ठाम आहेत. राज ठाकरे यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर मुंबई पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. राज ठाकरे यांना कलम १४९ अंतर्गत प्रतिबंधात्मक नोटीस देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी राज ठाकरे यांना ही नोटीस दिली आहे. राज ठाकरेंनी भोंगे उतरवण्यासंदर्भात उद्याचा अल्टिमेटम दिलेला आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंना कलम १४९ अंतर्गत मुंबई पोलिसांकडून प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आली आहे.

मुंबईतील मनसेच्या विभागप्रमुखांना पुढील १५ दिवस शहराबाहेर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज ठाकरे यांच्या आवाहनामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून मुंबई पोलीस आणि अतिरिक्त पोलीस बळ तैनात करण्यात आलं आहे. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरुन उद्या मशिदींबाहेर हनुमान चालिसा दुप्पट आवाजात लावण्याचे आवाहन केले आहे. राज ठाकरे यांना कलम १४९ अंतर्गत नोटीस देऊन पोलिस कायदेशीर प्रक्रिया राबवत आहेत. राज ठाकरे यांच्यावर १ मे रोजी औरंगाबाद येथे झालेल्या सभेसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद पोलिसांनी घातलेल्या १६ अटीपैकी १२ अटींचं उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या