24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीयराहुल गांधींची सलग दुस-या दिवशी चौकशी

राहुल गांधींची सलग दुस-या दिवशी चौकशी

एकमत ऑनलाईन

आज पुन्हा हजर राहण्यासाठी समन्स
नवी दिल्ली : नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात राहुल गांधी यांची आज सलग दुस-या दिवशी ईडीच्या अधिका-यांनी तब्बल ९ तास चौकशी केली. त्यामुळे कॉंग्रेस नेते, कार्यकर्ते संतप्त झाले असून, आज दिल्लीत कॉंग्रेसच्या मुख्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. तसेच देशभरातही विविध ठिकाणी निषेध करण्यात आला. दरम्यान, उद्या बुधवारी हजर राहण्यासाठी राहुल गांधी यांनी समन्स बजावले आहे.
Þ
कॉंग्रेस नेते राहुल गांधी आज सलग दुस-या दिवशी कारने तपास संस्थेच्या कार्यालयात पोहोचले. त्यांच्यासोबत प्रियंका गांधीही होत्या. राहुल गांधी यांना सोडल्यानंतर प्रियंका गांधी तिथून निघून गेल्या. दोन दिवसांपासून काँग्रेस कार्यालयाबाहेर निदर्शने सुरू असून, त्या पार्श्वभूमीवर या भागात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. दरम्यान, कॉंग्रेस नेत्यांसह राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह खासदारांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

तत्पूर्वी राहुल गांधी प्रियंका गांधींसह त्यांच्या घरातून काँग्रेस मुख्यालयात पोहोचले. राहुल-प्रियंका यांच्यासोबत काँग्रेस मुख्यालयात सर्व काँग्रेस नेत्यांनी चर्चा केली. येथून रणनीती तयार झाल्यानंतर राहुल ईडी कार्यालयाकडे रवाना झाले

विरोध करणा-यांचा आवाज दाबण्याचे काम
काँग्रेस कार्यालयात बैठकीला संबोधित करताना रणदीप सुरजेवाला म्हणाले की, ७० वर्षांत उभारलेल्या मालमत्ता सरकार विकत आहे. त्याविरोधात बोलत असलेल्या राहुल गांधींचा आवाज दाबण्यासाठी तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे. यामुळे काँग्रेस घाबरणार नाही.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या