28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रराहुल गांधींनी काँग्रेसचे अध्यक्ष व्हावे ही ९९ टक्के कार्यकर्त्यांची इच्छा

राहुल गांधींनी काँग्रेसचे अध्यक्ष व्हावे ही ९९ टक्के कार्यकर्त्यांची इच्छा

एकमत ऑनलाईन

मुंबई : खासदार राहुल गांधी यांनीच काँग्रेसचे अध्यक्ष व्हावे अशी ९९ टक्के कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. लवकरच काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे.

याबाबत नाना पटोलेंना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला असता ते बोलत होते. कोरोनानंतर यंदा गणेशोत्सव मोठ्या जोमात साजरा केला जात आहे. महागाई कमी व्हावी, बेरोजगारी कमी व्हावी, अन्नदाता बळिराजा सुखी व्हावा अशी प्रार्थना गणरायाला केली असल्याचे पटोले यावेळी म्हणाले. तसेच या गणशोत्सवाच्या राज्याच्या जनतेला शुभेच्छा देत असल्याचेही नाना पटोले म्हणाले.

जगातला श्रीमंत माणूस (अदानी) देशात तयार होत आहे. त्यामुळे जी दरी देशात निर्माण होत आहे त्यात कोणाची भागीदारी आहे. हे देशातल्या जनतेला समजत असल्याचे पटोले यावेळी म्हणाले. आज गणेशोत्सव आहे. त्यामुळे मी राजकीय काही बोलणार नसल्याचे पटोले म्हणाले. पण लोकांना मी जे बोललो ते कळले आहे. शेवटच्या माणसाला मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे. मात्र, गेल्या सात-आठ वर्षांत हा प्रवाह थांबला आहे. कृत्रिम महागाई वाढवली आहे. त्यांना गणरायाने सद्बुद्धी देवो आणि महागाईपासून जनतेला वाचवावे एवढीच गणरायासमोर प्रार्थना करत असल्याचे नाना पटोले यावेळी म्हणाले.
राज्यात शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांची युती झाली आहे. मनसे आणि भाजपा जवळ येत आहेत, याबाबत देखील नाना पटोलेंना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी पटोले म्हणाले की, महाराष्ट्रात काँग्रेस हाच मोठा पक्ष होता, आहे आणि पुढच्या काळातही तोच राहणार आहे. काही लोकांनी काँग्रेसच्या चुका नसताना त्या चुका असल्याचे सांगत डोके फिरवली आहेत.

मात्र, काँग्रेस पक्षच सर्वांना न्याय देऊ शकतो. जनमतावरच आमचा खरा विश्वास आहे. आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ आणि जनता पुन्हा काँग्रेसला आशीर्वाद देईल असा विश्वास नाना पटोलेंनी यावेळी व्यक्त केला. जिथे निवडणुका आहेत त्या त्या ठिकाणी तिथल्या लोकल व्यवस्थेच्या आधारावर आम्ही लढू. त्यामुळे आता याबाबत चर्चा करण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले

. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडी म्हणू निवडणूक लढू असे सांगितले आहे. याबाबतही नाना पटोलेंना प्रश्न विचारण्यात आला. याबाबत ते म्हणाले की, याविषयी अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. शरद पवार यांचा तो विचार असेल असेही पटोले यावेळी म्हणाले.
………..

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या