26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeक्रीडाराहुल-रोहितने रचला विक्रम

राहुल-रोहितने रचला विक्रम

एकमत ऑनलाईन

रांची : न्यूझीलंड विरुद्धच्या दुस-या टी-२० सामन्यात धावांचा पाठलाग करताना रोहित-राहुल जोडीने खास विक्रम रचला. सलग पाचव्या सामन्यात त्यांनी ५० धावांची भागीदारी पूर्ण केली आहे. अशी कामगिरी करणारी टीम इंडियाची ही पहिली जोडी ठरलीये. न्यूझीलंड विरुद्धच्या दुस-या सामन्यात या जोडीनं पहिल्या विकेटसाठी ११७ धावांची भागीदारी केली. यात त्यांनी पाकिस्तानी सलामी जोडीच्या विक्रमाशी बरोबरी केली.

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील स्कॉटलंड विरुद्धच्या सामन्यात या दोघांनी पहिल्या १४० धावांची भागीदारी रचली होती. स्कॉटलंड विरुद्ध दोघांनी पहिल्या विकेटसाठी ८६ धावा केल्या होत्या. नामिबिया विरुद्ध रोहित शर्मा आणि लोकेश राहुलने ५० धावांची भागीदारी रचली होती. न्यूझीलंड विरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात या दोघांनी ५० धावांची भागीदारी केली होती. दुस-या सामन्यात पुन्हा एकदा त्यांनी ५० + धावा केल्या. सलग पाचव्यांदा त्यांनी ही कामगिरी करुन दाखवली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या