24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeक्रीडालखनौचा ६ गडी राखून विजय

लखनौचा ६ गडी राखून विजय

एकमत ऑनलाईन

दिल्लीला धक्का, लखनौचा संघ दुस-या क्रमांकावर
मुंबई : आयपीएल २०२२ च्या हंगामातील १५ वा सामना मुंबईत डी वाय पाटील स्टेडियममध्ये लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये खेळला गेला. या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने २० षटकात ३ विकेट गमावून १४९ धावा करत लखनौला १५० धावांचे लक्ष्य दिले. लखनौने ६ गडी राखून हे लक्ष्य प्राप्त केले. यासह लखनौ गुणतालिकेत ६ गुणांसह दुस-या क्रमांकावर आला आहे.

प्रथम फलंदाजीला उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सकडून पृथ्वी ३४ चेंडूत ६१ धावांची दमदार अर्धशतकीय कामगिरी करून बाद झाला. वॉर्नरला मात्र १२ चेंडूत केवळ ४ धावाच करता आल्या. यानंतर ११ व्या षटकात दिल्लीला तिसरा झटका लागला. रवि बिश्नोईने रोवमॅन पॉवेलला बोल्ड आऊट केले. पॉवेलने १० चेंडूत केवळ ३ धावा केल्या. पॉवेलनंतर सरफराज खान मैदानात उतरला. यानंतर पंत आणि सरफराज अखेरपर्यंत खेळले. पंतने ३६ चेंडूत ३९ धावा केल्या, तर सरफराजने २८ चेंडूत ३६ धावा केल्या. दोघेही नाबाद राहिले. यासह दिल्लीने २० षटकात ३ विकेट गमावून १४९ धावा करत लखनऊला १५० धावांचं लक्ष्य दिले.

लखनौचा संघ १५० धावांच्या लक्षाचा पाठलाग करत मैदानात उतरला. सुरुवातीला लखनौचा कर्णधार के. एल. राहुलने २५ चेंडूत २४ धावांची, तर क्विंटन डी कॉकने ५२ चेंडूत ८० धावांची खेळी केली. यानंतर एविन लुईस १३ चेंडूत केवळ ५ धावा काढून बाद झाला. दीपक हुड्डालादेखील १३ चेंडूत ११ धावाच करता आल्या. अखेरीस कृणाल पांड्या आणि आयुष बदोनीने सामना लखनौच्या खिशात टाकला. पांड्याने १४ चेंडूत नाबाद १९ धावा, तर बदोनीने ३ चेंडूत नाबाद १० धावा केल्या. लखनौ सुपर जायंट्सने आतापर्यंत चारपैकी ३ सामने जिंकत दमदार प्रदर्शन केले. दुसरीकडे दिल्लीने आतापर्यंत ३ सामने खेळले असून त्यात दोन सामन्यात पराभव स्विकारला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या