26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeआंतरराष्ट्रीयलघुग्रहाची पृथ्वीशी टक्कर टाळण्यासाठी नासाची मोहीम

लघुग्रहाची पृथ्वीशी टक्कर टाळण्यासाठी नासाची मोहीम

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : असा एक अंदाज वर्तवला जातो की सुमारे सहा ते साडेसहा कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर एका मोठा लघुग्रह आदळला आणि यामुळे मोठ्या प्रमाणात जीवसृष्टी नष्ट झाली, विशेषत: त्यावेळी पृथ्वीवर मुक्त संचार करणारे डायनॉसोरही पुर्णपणे नष्ट झाले. शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की पृथ्वीवर लहान मोठ्या आकाराचे लघुग्रह हे अनेकदा आदळले आहेत आणि यामुळे मोठी उलथापालथ झाली आहे.

मग आताच्या काळात एखादा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर? अशी लघुग्रहाची टक्कर टाळणे शक्य आहे का ? तेव्हा भविष्यात होऊ घातलेली लघुग्रहाची टक्कर टाळण्यासाठी नासाने मोहीम हाती घेतली आहे.

नासा सध्या डीएआरटी म्हणजेच डबल अ‍ॅस्टेरॉईड रीडायरेक्शन टेस्ट या मोहिमेवर काम करत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून पृथ्वीला धोका नसलेले पण पृथ्वीपासून काही लाख किलोमीटर अंतरावरुन जवळून प्रवास करणा-या अनेक लघुहग्रहांपैकी एका लघुग्रहावर नासा एक यान अत्यंत वेगाने धडकवणार आहे. या माध्यमातून त्या लघुग्रहाची दिशा बदलवता येते का, लघुग्रहावर काय परिणाम होतो असा अभ्यास करणार आहे. या मोहिमेतून मिळणा-या माहितीचा उपयोग भविष्यात पृथ्वीवर आदळणा-या संभाव्य लघुग्रहाची टक्कर टाळण्यासाठी केला जाणार आहे.

कशी असेल डीएआरटी मोहीम?
नासाच्या डीएआरटी या मोहिमेला सुरुवात झाली असून आज ‘स्पेस एक्स’ या खासगी कंपनीने नासाच्या डीएआरटी मोहिमेतील उपग्रहाचे नुकतेच यशस्वी प्रक्षेपण केले आहे. या मोहिमेत सुमारे ६१० किलो वजनाचे यान हे पृथ्वीच्या जवळून काही काळ प्रवास करणा-या डीडमॉस लघुग्रहाच्या जवळून जाणार आहे. हे यान एक १३ किलो वजनाचा क्यूबसॅट वाहून नेणार आहे. तर डीडमॉस हा सुमारे ८०० मीटर लांबीचा लघुग्रह सुर्याभोवती ७७० दिवसांत एक प्रदक्षिणा पुर्ण करतो. हा लघुग्रह काही काळ पृथ्वीच्या जवळून प्रवास करतो. विशेष म्हणजे या डीडमॉस लघुग्रहा भोवती डीमॉसफस असे नामकरण केलेला, ३०० मीटर परिघ असलेला एक छोटा लघुग्रह फिरत असतो. तर या छोटेखानी डीमॉरफस लघुग्रहावर डीएआरटी या यानाने वाहून आणलेला डीएआरटी हा अत्यंत वेगाने धडकवण्याचा प्रयत्न नासा करणार आहे.

सप्टेंबर २०२२ मध्ये घडवून आणणार टक्कर
यामुळे डीमॉरफस लघुग्रहावर काय परिणाम होतो, त्याची दिशा बदलली जाते का, त्याचे तुकडे होतात का, लघुग्रहाच्या वेगावर परिणाम होतो का याचा अभ्यास नासा करणार आहे. पुढील वर्षी सप्टेंबर महिन्यात अशी टक्कर घडवून आणली जाणार आहे. तेव्हा भविष्यात एखाद्या लघुग्रहाची टक्कर पृथ्वीशी होऊ नये यासाठी विविध संकल्पना-मोहिमा नासा राबवत असून डीएआरटी मोहिम हा याचाच एक भाग आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या